🎬 Page 3 – ग्लॅमरच्या पडद्यामागची खरी कहाणी
दिग्दर्शक: Madhur Bhandarkar चे सिनेमे हे वास्तववादी असतात.. पण माझ्यासारखे कमी एक्सपोजर मिळालेली लोक ..जेव्हा असे सिनेमे बघतात ,तेव्हा विचार करतात,खरंच हे समाजात घडत असलेले वास्तव आहे, की मनोरंजनासाठी अती रंजित करून पडद्यावर दाखवल जात… ( अर्थात घडत तर असतं पण खूप कमी प्रमाणात घडत असेल असा माझा भ्रम होता)
पण आता epstein file मुळे ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे मात्र जगाला फक्त धक्के बसत आलेत… अर्थात ऊर्जा, औषध, संरक्षण ही क्षेत्र जग कोणत्या पद्धतीने कंट्रोल करत हे माहीत असून देखील जे Epstein file बाहेर
आलं तेव्हा मात्र पेज ३ या सिनेमाचा एक वाक्य आठवत ,
" ये मुंबई की गटर है, बंद रहे तो बेटर है "
⸻
✨ चित्रपटाची ओळख
Page 3 हा 2005 साली प्रदर्शित झालेला एक प्रभावी आणि वास्तववादी हिंदी चित्रपट आहे. समाजातील हाय-प्रोफाइल पार्ट्या, सेलिब्रिटींची लाईफस्टाइल आणि माध्यमांचं जग — यामागील वास्तव या चित्रपटात उलगडून दाखवलं आहे.
⸻
माधवी शर्मा (कोंकणा सेन शर्मा) ही एक तरुण पत्रकार आहे जी ‘Page 3’ बीट कव्हर करते. Page 3 म्हणजे वृत्तपत्रातील तो भाग जिथे पार्टी, फॅशन, सेलिब्रिटी आणि श्रीमंत लोकांच्या गॉसिप बातम्या छापल्या जातात. माधवी शर्मा च्य्या दोन रूम मेट आहेत. पर्ल आणि गायत्री .
सुरुवातीला माधवीला हे जग आकर्षक वाटतं — मोठ्या पार्टीज, स्टार्स, ग्लॅमर. ... पण जेव्हा माधवीला तिच्या office मध्ये काम करणारा, colleague विनायक म्हणतो की "तू कसली पत्रकार , फक्त कोण कुठं आलं ,कोण कुठे गेलं , कोणी काय घातलं ,कोणी कशी स्टाईल केली हे छापतेस आणि हे छापणं म्हणजे पत्रकार नव्हे"… तेव्हा ती हे वाक्य फार गांभर्याने घेत नाही..
हळूहळू तिला समजतं की या चमकदार दुनियेच्या मागे खूप खोटेपणा, स्वार्थ आणि शोषण दडलं आहे. जेव्हा ती अंजली थापर याच्या अंतीम संस्करासाठी आलेले लोक नंतर होण्याच्या पार्ट्या विषयी चर्चा करत असतात किंवा शहरामध्ये बाॅम्ब स्फोटांनंतर डीसीपी मात्र पार्ट्या मध्ये गुंग असतो ह्या सगळया गोष्टीमुळे लोक किती बेगडी आणि खोटेपणा मध्ये चांगुलपणाचा बुरखा घालून फिरतात याची जाणीव होते.
गायत्री ही चित्रपटात करिअर करायला आलेली अतिशय साधी मुलगी सुरवातीला तिला glamours जगातल्या बऱ्याच गोष्टी सहन होत नाहीत आणि आवडत ही नाहीत ,पण नंतर ही च गायत्री बदलते सुरवातीला तिला ज्या डिरेक्टर चा स्पर्श आवडत नाही त्त्याच्याबरोबरच तडजोड करून चित्रपट साईन करते. नंतर ती अगदी बदलून जाते.
या चित्रपटातील लता मगेशकरांनी गायलेल गाणं म्हणजे पर्वणीच आहे. हे गाणं नात्यांमधली गुंतागुंत, एकटेपणा आणि वरून चमकदार पण आतून रिकामं आयुष्य दाखवतं.
पर्ल ही एअर होस्टेस ही अतिशय बिनधास्त मुलगी आतून बाहेरून मनाने सारखी वाटते पण पैश्यासाठी वयापेक्षा जास्त असलेल्या माणसाशी लग्न करून सेटल होते.
माधवी जेव्हा हाय प्रोफाईल मधल्या Pedophile
प्रकरणातील सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करते, पण मीडिया आणि हाय प्रोफाईल लोकांच्या ओळखीने हे प्रकरण पूर्ण दाबण्यात येते!!
हा चित्रपट जेव्हा आता मी परत बघितला तेव्हा मला त्यातातले बारकावे कळत गेले. हे मात्र खर !!ह्या वेळी बऱ्याच गोष्टी मी relate करून बघत होते!!
🎭 चित्रपटाचा मुख्य संदेश
• ग्लॅमरच्या मागचं वास्तव
• मीडिया आणि पत्रकारितेतील नैतिक प्रश्न
• समाजातील ढोंग आणि दिखावा
• स्त्रीच्या संघर्षाची कहाणी
हा चित्रपट फक्त मनोरंजन नाही, तर विचार करायला लावणारा आहे.
⸻
🏆 पुरस्कार
या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार (Best Feature Film in Hindi) मिळाला होता, ज्यामुळे त्याचं महत्त्व अधिक वाढलं.
⸻
🌟 का पाहावा?
• वास्तववादी कथा
• दमदार अभिनय
• समाजावर भाष्य करणारा विषय
