Fit for TV Documentary 
Home  ∣  मनोरंजन   ∣   Fit for TV Documentary 

सहज म्हणून Netflix वर गेले आणि काही प्लॅन नसताना पूर्ण डॉक्युमेंट्री बघून उठले.४५ मिनिटांचे तीन सीझन आहेत. ‘Fit for TV-The reality of biggest loser ‘ Fit for TV: The Reality of The Biggest Loser ही Netflix वरील तीन भागांची डॉक्युमेंटरी सिरीज आहे, जी The Biggest Loser या लोकप्रिय रिऐलिटी शोच्या खऱ्या अनुभवाचे पर्दाफाश करते — show च्या भावनिक, शारीरिक परिणामांसह.  सध्या माझ ही वजन प्रचंड वाढलं आहे 🙃आणि गंमत म्हणजे वजन वाढण्याची कारणही माहीत आहे आणि कमी करण्याचा उपायही ?.पण का कोणास ठावूक 🤔अंमलबजावणी मात्र होत नाही . म्हणून म्हटलं बघू काय प्रेरणा मिळते का.. या कार्यक्रमातून?..

पण बऱ्याचदा आपल्या सगळ्याच अस होत की प्रेरणा मिळतात ..पण सातत्य मात्र राहून जात , मुळात बाह्य प्रेरणा ही तात्पुरत्या स्वरूपात असते…असो…आपण तात्पुरत्या सुटका ( रिलीफ) कडे जास्त अधिक आकर्षित होतो. व्यसन त्याचाच एक भाग आहेत. Biggest loser मधला एक प्रतियोगी म्हणतो, “ मला माहीत आहे लोक कशासाठी नशा करतात. मी कधीही नशा केली नाही . चरक , गांजा ची नशा काही काळासाठी सगळं विसरवून टाकते . आणि नेमक्या ह्याच कारणासाठी मी मात्र खातो.” Bob Harper हा ट्रेनर आहे , तो म्हणतो “आपण सगळे वेडे असतो आपल्या दिसण्यासाठी. जिम हे त्याच विश्व आहे टीव्ही मधे पाहतो ते सगळे एक्टर एक्टरेस सेलिब्रिटी , models ते सगळे त्याच्याकडे यायचे. तो म्हणतो खर तर माझ्याकडे सगळेच आधीपासूनच फिट असायचे . पण अश्या अति जास्त वजन असलेल्या माणसाना ट्रेनिंग द्यायची ही त्याची पहिलीच वेळ आहे.

“The Biggest Loser” शो
👉 एकूण 18 सिजन झाले आहेत 🏆 — ह्यात NBC वर 17 सिजन (2004–2016) आणि 2020 मध्ये एक reboot सिजन 18 आला होता. 
🔹 म्हणजे:
• Season 1 ते Season 17 — 2004 ते 2016 मध्ये
• Season 18 — 2020 मध्ये
👉 एकूण = 18 सिजन
“The Biggest Loser” शो
👉 एकूण 18 सिजन झाले आहेत 🏆 — ह्यात NBC वर 17 सिजन (2004–2016) आणि 2020 मध्ये एक reboot सिजन 18 आला होता. 
🔹 म्हणजे:
• Season 1 ते Season 17 — 2004 ते 2016 मध्ये
• Season 18 — 2020 मध्ये
👉 एकूण = 18 सिजन

टीव्हीवर हा शो खूप प्रेरणादायक वाटतो…
पण पडद्यामागे चित्र थोडं वेगळं असतं. हे ह्या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी मधे दाखवण्यात आल आहे.

लोकाना हासवणे, TRP वाढवण्यासाठी शो मधे अनेक टास्क करण्यासाठी सांगितल्या जात .. त्यातला एक टास्क असा होता की, स्पर्धकांनी फूड टॉवर बनवायचा.. आणि त्यासाठी लागणारं फूड हे तोंडाने उचालयाच… खरं तर कॅलरी deficit करत असताना ..तोंडाने न खाता उचलले हे खूप अवघड टास्क आहे.. तसच ह्या शो मध्ये खूप प्रलोभन दिली जायची.. म्हणजेtemptation round शो मध्येच अचानक खूप कॅलरीज असलेलं फूड दिलं जायचं आणि खूप खणाऱ्याला बक्षीस अस जाहीर केलं जायचं..

खरं तर प्रलोभन ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. त्याला बळी कोण कसं पडेल सांगता येत नाही… मुळात ह्या शो च बक्षीस सुद्धा एक प्रलोभन च आहे…

खरं तर वजन कमी करण्यासाठी काय लागतं … तर एक healthy diet आणि थोडा exercise ..
पण हे सगळं दाखवल तर ते कंटाळवाण होऊन जाईल आणि हे बघणार कोण?? प्राईम टाईम मध्ये टीव्ही ला बांधून बसणारे प्रेक्षक कसे मिळणार??? म्हणून लोकांना आवडणाऱ्या गोष्टी केल्या जात…
त्यामध्ये जिम् ट्रेनर च सतत ओरडणं, उलट्या येईपर्यंत व्यायाम करून घेणं , व्यायाम करताना पडणे, अगदी बेशुद्ध होईपर्यत व्यायाम करणे ह्याचा समावेश असायचा. जेवढं लोकांचं मनोरंजन तेवढं TRP जास्त .

Dr.huizenga हे शो मध्ये मार्गदर्शनाच काम करत होते , ते म्हणतात , ह्या शो मधल्या अनेक गोष्टींशी ते सहमत नव्हते . अगदी डाएट च्या बाबतीत सुद्धा .. पण ट्रेनर त्यांचं ऐकत नव्हते . ट्रेनर च्य मते डाएट आणि exercise मध्ये डॉक्टरांनी लक्ष घालू नये.

गंमत म्हणजे, या शोमधील स्पर्धक भावनिकदृष्ट्या संघर्ष करणाऱ्या लोकांमधून निवडले गेले होते.
“आम्ही आनंदी आणि जाड लोक शोधत नव्हतो,” असे कार्यकारी निर्माता जेडी रॉथ सांगतो.
“आम्ही असे लोक शोधत होतो जे जाड होते आणि आनंदी नव्हते.”

Tracey शोमध्ये फक्त वजन कमी करण्यासाठी नव्हती; तिने आपलं आयुष्य बदलण्यासाठी पाऊल उचललं. तिच्या म्हणण्यानुसार, तिचं वजन तिच्या लग्नाच्या समस्या आणि आत्म‑इमेजशी जोडलेलं होतं. तिने ठरवलं की हा शो तिच्यासाठी एक संधी आहे.. पण येवढं सगळं करून तीच लग्न टिकत नाही. पण आता मात्र ती म्हणते दुःख, संकट सगळ्यांना येतात फक्त सगळया गोष्टींना सामोरे जा!! या शो मध्ये प्रत्येक स्पर्धकांची एक स्टोरी आहे.

डॉक्टर Huizenga म्हणतात, "टीव्हीसाठी नाट्य वाढवलं जात होतं, पण आरोग्य नेहमी प्राधान्य असायला हवं, असं त्यांचं मत.शोमधील पद्धत खऱ्या आयुष्यासाठी टिकाऊ नाही, असंही त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केलं."

जिम ट्रेनर वर कॅफिन किंवा appetite suppressants” दिल्याचे आरोप केले गेले.

The Biggest Loser” शो नंतर अनेक स्पर्धकांच वजन परत वाढले ..याबद्दल आणि मेटाबोलिझम (resting metabolic rate) बद्दल वैज्ञानिक संशोधन “peer‑reviewed journal” मध्ये प्रकाशित झालंय. शरीराने वजन कमी झाल्यावर बॅसल मेटाबोलिझम (कमी केला, ज्यामुळे वजन टिकवणं कठीण झालं.  त्यामुळे अनेकांच्या मते शो मुळे metabolism बिघडलं.

शो मधील स्पर्धक म्हणतात, शो संपल्यावर कोणीही परत आमची चौकशी केली नाही. त्यांना आमच्या आरोग्या ची काही काळजी नव्हती त्यांना फक्त मनोरंजनाची काळजी होती.

Aubrey Gordon म्हणते " ह्या शो चा दावा होता की, जाड असाल तर मरुन जाल आणि एकदम फिट असाल
exercise कराल तर काही होणार नाही . पण Bob Horper त्यांच्याच जिम ट्रेनर ला 2017 मध्ये heart attack येवून गेला. आणि हा दावा खोटा ठरला.Bob Harper ला हार्ट अटॅक आला होता जेव्हा तो आपल्या नेहमीच्या जिम वर्कआउट दरम्यान अचानक खाली कोसळला.  Reality TV ( आता तर खऱ्या जीवनात)मध्ये entertainment आणि marketing हाच नंबर वन; स्पर्धक किंवा त्याची’ health secondary असतो.

documentary तुम्हाला The Biggest Loser सारख्या reality show चा खरा अनुभव दाखवते. Show जेवढं glamorous दिसतं, तितकं सोपं नाही!