🍗🍖पोट्टा फ्राय🍖🍗
Home  ∣  पाककृती   ∣   🍗🍖पोट्टा फ्राय🍖🍗

नवऱ्याला नॉनव्हेज आवडत म्हणून, अनेक व्हेजिटेरियन बायका नॉनव्हेज बनवायला शिकतात (अर्थात अपवाद वगळून) तशीच ढोबळमानाने मी ही शिकले. मग मासे , मटण , चिकन असो वा खेकडे काही ही असेल तरी बनवते. लग्नाआधी मटण आणण्याच्या पिशवीला हात न लावणारी मी🫢… आता चिकन ला मसाले अगदी व्यवस्थित चोळून मॅरीनेट करायला ठेवते🤣 . माश्यांना 🐟🦈सुद्धा चिरा 🔪🔪देवून मसाले लावते. अर्थात मला माहीत आहे हे फार काही विशेष नाही. ..

मांसाहार बनवायला जरी शिकले असले, तरी तो कसा होतो हे एक्झॅक्टली मला ही माहित नाही.( जोपर्यत मी खात नाही तोपर्यंत🤪) .

जेवण बनवण एक वेगळी बाब आहे. आणि जेवण वाढणं वेगळी बाब !! ते मांसाहारी जेवण वाढताना जाणवतो. कोणाला काय वाढायच? 🤔 कारण त्यात पण बऱ्याच आवडी निवडी असतात आणि समान वाटणी….हे तर फारच अवघड….अवघड टास्क ..कलेजी , नळी पर्यंत ठीक आहे पण पोट्टा , मान , मांडीच मटण याच काय??? 🤔🤔सवयी चा भाग आहे म्हणा हा 🤣त्यामुळेच आता रश्याच्या मोठ्या पातेल्यातून शोधून काढायला सराईत झाले 😀. आणि सगळी biology सांगायला पण 😉. नवऱ्याला पोट्टा आवडतो म्हणून तो मी सुक्या चिकन पेक्षा रश्श्यात टाकते लगेच सापडतो त्यामुळे😁. पूर्वी मला वाटायचं कोण खात का तरी हा चिकन चा हा oragan 🤔🤪. पण आता कळलं अरे !!ही तर हल्ली हॉटेल मध्ये मिळणारी एक डिश आहे. आणि बाजारात फक्त पोट्टा सुद्धा मिळतो.

चिकन किंवा मटण मधले सगळे part आपल्याला नावावरून कळतात . म्हणजे कलेजी म्हणजे लिव्हर . किंवा नळी अगदी आपटून आपटून त्यातला bone marrow खातात.पोट्टा म्हणजे पोट !! पक्ष्यांच्या पोटाला gizzard म्हणतात. आता मला detail लिहायचा मोह होत आहे पण खूपच dissection होइल याच भान ठेवून 😃 आपण पोट्टा कसा करायचा हे बघू… जर चिकन चा स्वयंपाक मध्ये सुक चिकन , पातळ चिकन हे सगळं बनवून पोट्टा ही बनवायचा असेल तर … फार फाफटपसारा न करता सोप्या पद्धतीने पोट्टा फ्राय करावा करावा…

🍗🍖पोट्टा फ्राय करताना -🍖🍗


पोट्टा स्वच्छ करून मीठ , हळद, मिरची पावडर थोडीशी मिरी पावडर, असल्यास तंदूर मसाला किंवा गरम मसाला , आलं लसूण पेस्ट लावून वरून थोडंसं लिंबू पिळून सगळं व्यवस्थित लावून मिक्स करून पंधरा वीस मिनी ट मॅरीनेट करावं…
नंतर जेवढं पोट्टाला पाणी सुटलं आहे तेवढंच तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर टाकून मिक्स करून गरम तेलात तळून घ्यावे. स्वादिष्ट पोट्टा फ्राय तयार ….