Girlfriend
Home  ∣  Uncategorized   ∣   Girlfriend

तो तिला त्याच्या आईला भेटण्यासाठी घरी घेवुन जातो. त्याची आई अतिशय आनंदी होते ,पण काही बोलत नाही , नजरेला नजर ही देत नाही. काम करण्यासाठी किचन मध्ये निघून जाते.

आई आनंदी तर खूप असते पण एकदम दबून . ती बाहेर थांबून मनमोकळेपणाने बोलण्यापेक्षा किचन मधे जाऊन सतत काम करत बिज़ी राहते. भूमा त्याला (विक्रम) विचारते ,आईला बोलता येत नाही का?? तो म्हणतो आई बोलू शकते. ती म्हणते मग आई अशी का?

तो म्हणतो आईला आता सवय झाली आहे ,पाहुणे आले की शांत बसायच . कारण पाहुण्याचा समोर आलेल वडिलांना आवडत नसे.. वडील चिडले तर आई त्यांच्या समोर पण जायची नाही. … पुढे जाऊन तो म्हणतो ,त्या पिढीमधल्या बायकांचा त्याग , स्वभाव , आपल्या मर्यादा मध्ये राहणं या मुळे त्यांची पूजा होयला हवी खर तर!! त्याला त्याच्या आई च्या स्वभावाबद्दल फार काही वाटत नाही .पण तो तिला(भूमाला)म्हणतो ,मी मात्र माझ्यवडिलांसारखं तुझ्याशी वागणार नाही.

विक्रम आणि भूमा कॉलेज कपल....भूमा तिच्याही नकळत त्याची कमिटेड गर्लफ्रेंड बनून जाते.भूमा ही अतिशय साधी, तशी म्हणायला गेल तर घाबरट मुलगी. girlfriend बनल्या नंतर विक्रम ची प्रेमाने काळजी घेते त्याची रूम साफ करते. कपडे नीट लावते. घास भरवणे इत्यादी सगळ्या गोष्टी मनापासून करते . विक्रम ला ती नेहमी आई सारखी वाटते.

दुर्गा नावाची मुलगी जी विक्रम च्या पाठीमागे असते ती त्याच्या कॉलेज ची असते . दुर्गा अतिशय बोल्ड आणि बिनधास्त विचारांची असते. मनातून विक्रम ला आवडून देखीलही ,ती त्याच्या टाइप ची नसते म्हणून तिला नेहमी टाळतो. खरं तर समाजामध्ये नेहमीच दिसूनअनेक पुरुषांना मैत्रिणी ह्या बोल्ड आणि बिनधास्त आवडतात आणि बायको मात्र साधी , घरेलु टाइप मध्येच हवी असते.

अनेकींना जसे अपेक्षित असते तस प्रेम करणारा विक्रम ....हॉटेल मध्ये गर्लफ्रेंड च्या कॉफी चे पैसे भरतो. ती आजारी असल्यानंतर तिची काळजी घेतो. तिची जबाबदारी , काळजी, सुरक्षिता , प्रेम या बाबत तर तो कुठेच कमी नाही….

एके दिवशी दुर्गा ,भूमाला म्हणते “ विक्रम तुझ्यासाठी ठीक मुलगा नाही. तुझ्यामध्ये एक स्पार्क आहे. पण विक्रमच्या मागे पुढे करण्यात हा स्पार्क संपून जाईल.”

अतिशय धाडस करून भूमा विक्रम ला विचारू पाहते आपण ब्रेक घेऊ या का? पण तिला ते ही धाडसाने विचारता येत नाही. पण जेव्हा लग्नाचा विषय येतो तेव्हा ती धाडस करून बोलते आणि नंतर मग आपल्याला पाहायला मिळतो विक्रम चा राग आणि आक्रमता..

आपण समाजामध्ये नेहमीच बघतो , बायकांप्रती सगळ्या कर्तव्याची पूर्ती करणारे पुरुष, अतिशय काळजी, मालकी हक्काने किंवा स्वयंप्रेरणने प्रेम करणारे पुरुष .. खर तर याला आक्षेपहार्य काही नाही..पण ह्या सगळ्या गोष्टीना किंचितही विरोध बाई ला करता येत नाही हे वास्तव…आणि जर केला तर नक्की बाई ला हव काय ? हा उपप्रश्न करून फेमिनिझम च वेड म्हणून विनोद ही केला जातो.

Netflix वर उपलब्ध असलेला girlfriend हा चित्रपट समाजातील एका वास्तवावर प्रकाश टाकतो—अनेक पुरुष प्रेम, काळजी आणि जबाबदारी दाखवतात, पण स्त्रीला त्या नात्यात स्वतःचा विरोध किंवा स्वतंत्र मत व्यक्त करण्याची मोकळीक नसते. स्त्रीला नेहमीच मर्यादित स्वातंत्र्य दिले जाते, आणि त्या चौकटीतच तिला जगावे लागते.

परावलंबी आणि परप्रकाशी जगण्याचा कंटाळा आला अस म्हणण्याचा अधिकार इथे बाईला नाहीच आहे. बौद्धिक संपत्ती नसण्याची खंत बाई कडे नेहमीच असते.. कारण कुंपणापर्यंत बगडण्याच स्वतंत्र तिला नेहमीच दिलंय आणि ती बागडते सुद्धा...