1-2 मिनिटाचे रील, किंवा एखादा प्रोपोगंडा सिनेमे, जास्त बजेट चे सिनेमे , किंवा अनेक उत्प्रेरक सिनेमे बघणाऱ्या लोकांना हा मुक चित्रपट किती आवडेल ? माहीत नाही.. पण Gandhi talks हा सिनेमा बघताना आपण त्यात गुंतून आणि हरवून जातो हे मात्र नक्की…
किशोर बेळेकर हे तब्बल एक दशक चित्रपटाची पटकथा लिहीत होते . चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा त्यांनीच केलं केलं आहे. दोन तास दहा मिनिटांचा अतिशय बोलका मूकपट !! ए.आर.रेहमान यांच संगीत सिनेमाला अधिकच उंचीवर घेवून जात.
खरं तर चित्रपटाचे कथानक अगदी साधं आणि सरळ आहे. महादेव ( विजय सेतुपती)हा एक साधा, बेरोजगार तरुण असतो. तो शहरात आपल्या आईसोबत राहतो आणि खूप गरिबीत जीवन जगत असतो. नोकरी मिळत नाही, पैसे नाहीत आणि आयुष्यात सतत संघर्ष असतो. त्यामुळे तो खूप निराश होतो.
मोहन बोसमन (अरविंद स्वामी)हा खूप श्रीमंत आणि यशस्वी उद्योगपती असतो. तो मोठ्या इमारती आणि प्रोजेक्ट्स बनवणारा इंजिनियर-व्यवसायिक असतो आणि त्याच्याकडे खूप पैसा व सत्ता असते.
सुरुवातीला त्याचे आयुष्य खूप चांगले चाललेले असते—
मोठा व्यवसाय ,आलिशान घर ,समाजात प्रतिष्ठा
पण अचानक त्याच्या आयुष्यात मोठी दुर्घटना घडते. त्याचा व्यवसाय कोसळतो, त्याची संपत्ती जप्त होते आणि तो मोठ्या कर्जात अडकतो. यामुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते.
एकेकाळी श्रीमंत असलेला माणूस सगळं गमावून तुटून जातो. त्याच्या आयुष्यात राग, निराशा आणि सूडाची भावना निर्माण होते.
मंगू ( सिद्धार्थ जाधव)हा मुंबईच्या रस्त्यावर राहणारा छोटा चोर / पिकपॉकेट असतो. तो खूप गरीब परिस्थितीत जगत असतो आणि जगण्यासाठी लोकांचे पाकीट चोरणे, छोटे-मोठे चोरीचे काम करतो.
तो स्वभावाने थोडा हुशार, खोडकर आणि रस्त्यावरचा माणूस आहे. पैशासाठी तो काहीही करण्यास तयार असतो, पण त्याच्या मनात पूर्ण वाईटपणा नसतो.
वरकरणी ढोबळ वाटणारी कथा आहे. पण सिनेमात ज्या पद्धतीने बारकावे दाखवले आहेत त्यातच चित्रपटाचं यश आहे. नोटेवर दिसणारे गांधीजी , नोटांच महत्व . समाज भ्रष्टाचाराने किती पोखरला आहे हे चित्रपटात दाखवल आहे. इथं लााच घेताना पैसे असतील तर I love Gandhi असा कोड वर्ड ठेवणं .आणि प्रत्यक्षात असलेली गांधींची शिकवण यात असणारा विरोधाभास.. नोकरी मिळण्या पासून ते न्यायालयीन केस जिंकण्या पर्यंत चे सगळे व्यवहार पैस्यावर कसे चालतात हे या मूकपट मध्ये दाखवणे हे दिग्दर्शकाच्या असामान्य प्रतिभेच कौतुकच!!
कठीण प्रसंगात ही निती मुल्याशी तडजोड न राहणं हे खूप जिगरबाज पणाच लक्षण आहे आणि ते खूप थोड्या लोकांना जमत.खरं तर नीतिमत्ते ची गरज काय? असा प्रश्न विचारणाऱ्या पिढ्या निर्माण होऊ पाहत आहे ...
फक्त स्पर्धेत पुढे जाणं आणि मग फक्त उपभोग या तत्त्वानुसार चालणारे लोक . त्यांच्या मते निती वैगेरे फक्त बोलण्याच्या भाषा आणि पुस्तकातील गोष्ट..अस म्हणून फक्त उपभोगला आनंद मानून चालतात. पण नीतिमत्ते ची पिढीला गरज काय याचं सरळ एक उदाहरण बघू..
इराण आणि इराक च युद्ध हे तब्बल नऊ वर्ष चाललं या युद्धात केमिकल वेपण पण वापरले गेले . पण या युद्धा मध्ये तेलसाठे आणि रिफायनरी वर कधीही हल्ले केले नाहीत. कारण देशाचं पोट पाणी कशावर चालू आहे हे त्यांना माहीत होत…पण आता या युद्धात आपण बघत आहोत काय चालू आहे?
सत्ता ,शक्ती , वर्चस्ववाद यांच्या मागे जाण्याची मानवी प्रवृत्ती आहे आणि यासाठी माणूस कोणत्याही थराला
जातोय मग यासाठी किमान नीतिमत्ते चे लगाम तरी असावेत.
