हिंग: स्वयंपाकातील अनिवार्य घटक आणि औषधी फायदे
Home  ∣  Uncategorized   ∣   हिंग: स्वयंपाकातील अनिवार्य घटक आणि औषधी फायदे

हिंग (Asafoetida) – स्वयंपाकातील खमंग घटक आणि औषधी उपयोग

डेव्हिल डग म्हणा किंवा सैतानाच शेण 🙈म्हणा, आमचा स्वयंपाक हिंगाच्या खमंग फोडीनिशिवाय अपुरा आहे. डाळ, सांबर, इडलीची चटणी, पोहे असो वा चिवडा — हिंगाची फोडणी ही हवीच. लहान मुलांच्या पोटात दुखलं तर हिंग उगाळून बेंबीच्या बाजूला लावतात. सकाळी हिंगाचं पाणी पिलं की पचन सुधारतं आणि गॅसेस पण होत नाहीत. असं लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत. मसाल्याच्या डब्यातला एक महत्वाचा घटक.

हिंगाचे आयुर्वेदिक महत्व

वाग्भट म्हणतो, “हिङ्गु शरीरातील वात विनाशक, पाचन अग्नि वृद्धिकारक आणि जडता हरवणारा दिव्य औषध”. अष्टाङ्ग हृदयात हिंगुला दीपन द्रव्यांच्या यादीत स्थान दिलं आहे: “चव्य-चित्रक-हिङ्गु-शुण्ठी-मरीच-पिप्पली… दीपनानि”. याचा अर्थ, हिंग आणि इतर द्रव्यांनी पचनशक्ती तेजस्वी होते आणि शरीरातील वात दोष शांत होतात.

वाग्भट पुढे सांगतो की हिंग शरीराला हलकेपणा देतो, उदरातील वायू नष्ट करतो आणि पोषण शक्ती वृद्धिंगत करतो. तसेच, हिंग तेलात किंवा पाण्यात मिसळून वापरल्यास उदरविकार, वातशूल, अपचन अशा रोगांवर उपयुक्त ठरतो. हिंग हा फक्त स्वाद वाढवणारा घटक नाही, तर शरीर व मनाचे संतुलन राखणारा नैसर्गिक अमृत आहे.

हिंगाचा इतिहास

महाभारत, मनसोल्लासा या प्राचीन ग्रंथामध्ये हिंगाचा उल्लेख सापडतो. हिंग कुठून येतो? 🤔 अफगाणिस्तान, इराण, उझबेकिस्तान मधून. हो, बरोबर वाचलं तुम्ही 🙂 इराण-अफगाणिस्तानमध्ये हिंग बनत असल्यामुळे तिथून मुघल साम्राज्याबरोबरच भारतात आला, असं मानलं जातं. मात्र त्याआधीही भारतात हिंग वापरला जात होता. संस्कृतमध्ये हिंगु नावानं ओळखला जातो. भारतात हिंग ख्रिस्तपूर्व 600 वर्षांपूर्वी आला असंही मानलं जातं.

हिंगाचे उत्पादन कसं होतं?

  1. हिंग झाड – Ferula: हिंग झाडाचा दूधासारखा चिकट रस (latex/gum) असतो. हे झाड अफगाणिस्तान, इराण, कोरड्या पर्वतीय भागात वाढतं.
  2. मुळांमध्ये कट करणे: झाड ४–५ वर्षांचं झाल्यावर त्याच्या जाड मुळांवर छोटा कट केला जातो. या कटमधून पांढऱ्या रंगाचा दुधासारखा रस बाहेर येतो.
  3. रस गोळा करणे: हा रस हवेत लागल्यावर कडक होतो आणि तपकिरी रंगाचा होतो. कामगार हा घट्ट झालेला हिंगाचा गोंद हाताने गोळा करतात.
  4. कोरडं करणे: गोळा केलेला गोंद काही दिवस छायेत वाळवला जातो. वाळल्यानंतर तो अधिक कडक, सुगंधी आणि तीक्ष्ण बनतो.
  5. ग्रेडिंग आणि साफसफाई: वाळलेला कच्चा हिंग तुकडे, दाणे किंवा केक म्हणून वर्गीकृत केला जातो. अशुद्धी काढून शुद्ध हिंग तयार करतात.
  6. भारतामध्ये पुढची प्रक्रिया: अफगाणिस्तानमधून कच्चा हिंग भारतात येतो. त्यात थोडं गम अरेबिक, मैदा किंवा भाताचं पीठ मिसळलं जातं, ते पावडर करून पॅक केलं जातं. उत्तर प्रदेशात हाथरस हे हिंग बनवण्यात अग्रेसर आहे.

हिंगाचे प्रकार

1) लाल हिंग (Red Hing / Hing Kabuli / Hing Lal)

  • रंग: तपकिरी-लालसर
  • सुगंध: खूप तीव्र आणि तिखट
  • शुद्धतेचं प्रमाण जास्त
  • उष्णता: पोटासाठी गरम
  • वापर: उत्तर भारतीय स्वयंपाक — डाळ, राजमा, चणा, आलू सब्जी, तडका
  • झाड: Ferula assa-foetida (अफगाणिस्तान, इराण)

2) पांढरी हिंग (White Hing / Hing Hadda / Irani White Hing)

  • रंग: फिकट पिवळा-पांढरा
  • सुगंध: सौम्य, लाल हिंगइतका तीव्र नाही
  • उष्णता: सौम्य
  • वापर: दक्षिण भारतीय, सात्विक, जैन स्वयंपाक — सांबार, रसम, कढी, हलक्या भाज्या
  • झाड: Ferula narthex / Ferula foetida

हिंगाचा रासायनिक composition

  • Resin (40–60%) – तीव्र सुगंध आणि औषधी गुण; Ferulic acid, Umbelliferone, Asafoetidinol, Asafoetidin
  • Gum (25%) – पचनास मदत करतो
  • Volatile/Essential oil (10–17%) – Isobutyl propanyl disulfide, Sulfur compounds
  • Ash (4–10%) – Calcium, Iron, Phosphorus, Magnesium

हिंगाचे उपयोग

1) स्वयंपाकात:

तडका/tempering, Onion-Garlic न वापरणाऱ्या पदार्थात चव वाढवण्यासाठी.

2) पचन सुधारण्यासाठी:

गॅस कमी करतो, पोटातील फुगवटा/अपचन कमी करतो, डाळ किंवा कडधान्यांमध्ये वापरल्यास पचन सुलभ होते.

3) औषधी उपयोग (Traditional/Ayurveda):

Antimicrobial & Anti-inflammatory, सर्दी, खोकला, दमा, मूत्रवर्धक, हृदयासाठी उपयोगी.

4) इतर उपयोग:

वजन कमी करणारे पदार्थ, हिंग चहा, कीटक/प्राणी विरोधी.

महत्त्वाच्या टिप्स

  • जास्त प्रमाणात घालू नका, तीव्र चव येते
  • काही लोकांना पचनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते
  • जगभरात हिंगाच्या 130 प्रजाती आहेत, परंतु फक्त काही झाडांपासून हिंग तयार होतो
  • 2020 साली CSIR ने हिमाचल प्रदेशात हिंगाची लागवड केली; 4-5 वर्ष लागतात

हिंग फक्त मसाला नाही, तर शरीर व मनाचे संतुलन राखणारा नैसर्गिक अमृत आहे. खमंग फोडणी दिल्यानंतर घरातील स्वयंपाक आणि वातावरण अगदी खमंग करतो..