
सतीश आळेकर आणि मोहन आगाशे याच्या दिलखुलास (बोल भिडू balcony) गप्पा मधून' ट्रेन टू पाकिस्तान' हा चित्रपट you tube वर आहे म्हणून कळलं म्हणून यू tube जाऊन बघितला….
‘मनो माजरा ‘……एक अस गाव तिथे हिंदू ,मुस्लिम ,शिख
एकोप्याने राहतात. एकमेकांची काळजी घेत प्रेमाने गुण्यागोवंदानं एकत्र राहत . देशात फाळणी झाली तरी गावातली एकी ,प्रेम मात्र तसच ….जणू फाळणी म्हणजे फक्त एका कागदावर ची सही … या गावात काही संकट आणि प्रश्न नाहीत अस नाही….. खून, चोरी , दरोडे ही मोठी संकट… पण त्याचा जाती धर्माशी काही संबंध नाही….
खुशवंत सिंग यांच्या ट्रेन टू पाकिस्तान या पुस्तकावर आधारित असलेला हा सिनेमा…
एक दिवस पाकिस्तान वरून एक ट्रेन येते …. या ट्रेन मधून मात्र कोणीही खाली उतरत नाही ,कारण ट्रेन मधल्या सगळ्या माणसांना मारलेल असतं…..
याच परिस्थिमध्ये गावात एक टोळकी घुसते आणि वातावरणात द्वेष वाढवण्याच काम करते….,
गावातील मुस्लिम लोकांना कॅम्प मध्ये आणि नंतर पाकिस्तान मध्ये पाठवण्याच ठरत. पण अशा परिस्थतीमध्ये सुद्धा गावातील लोकांना मुस्लिम बांधवांची काळजी वाटते….
पण गावात घुसलेली ही टोळी मात्र द्वेष आणि
हिंसाचार वाढवण्याचा प्रयत्न करते आणि त्यात यशस्वी होते….मुस्लिम लोकांची ट्रेन पाकिस्तान ला जात असताना त्यांना ही मारण्याचा कट केला जातो तेव्हा ह्याच गावातला गुंड त्यांचा कट स्वतच्या प्राणाची आहुती देवून उधळून लावतो…ट्रेन ला सुखरूप वाचवतो…
या सिनेमात मोहन आगाशे यांची सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका आहे. जो अत्यंत विलासी, दारुपिनारा मजेत राहणारा आहे. जो एका मुस्लिम तरुण मुलीला ठेवून घेतो. सरकारी कामा मधे त्याचे ही हात बरबटलेले असतात ..तर काही काम नाईलाजास्तव करावी लागल्यामुळे. पण असा ऐशीत राहणाराअधिकारी ही नंतर कोलमडून जातो काळानुसार जबाबदारी ची जाणीव त्याला होते आणि त्या मुस्लिम मुलीच्या सुरक्षेची काळजी वाटू लागते…
असा हा संवेदनशील सिनेमा!!!!
