स्त्रियांचा आचार विचार नाही...स्वैराचार..!!!
"जहाँ भी आजाद रुह की झलक पडे, समझना वह मेरा घर है" असं म्हणणारी आणि जगून दाखवणारी अमृता प्रीतम म्हणते जी व्यक्ती मुक्त असते ती सुंदर असते. पण ही मुक्तता-स्वतंत्रता स्त्रीच्या वाट्याला आलीच नाही किंबहूना समाजाला ती स्त्रीला कधी
मिळून द्यायची नव्हती.
शेतीचा शोध लागला आणि माणूस टोळीने राहू लागला ह्या टोळ्यांमध्ये स्त्रीला मानाचे स्थान होते.
पण हळूहळू संपत्तीमधून सत्ता आणि वंशसातत्य या कारणाने पुरुषा एवढी स्वतंत्र असणारी स्त्री गुलाम झाली पुरुष सत्तेखाली दाबून गेली.
विवाह संस्थेमुळे कौमार्य, योनिशुचीता, पतिव्रता या संकल्पना उदयाला आल्या. समाजाच्या मनावर फार बिंबवण्यात आल्या म्हणूनच आज स्त्री थोडी स्वतःच्या मर्जीने वागली तर या संकल्पनेत ती कुठे बसते हे बघितलं जातं आणि लगेच चारित्र्यावर संशय घेतला जातो.
आजही समाजमनावर पुरुषसत्ताक पद्धतीने येवढं काही बिंबवून ठेवलं आहे की स्त्रीने पुरुषाचे वर्चस्व हे सहन केलेच पाहिजे. कुठे तिने विरोध केला तर तिचे चरित्रहनन होते किंवा बळजबरी. स्त्री मुक्ती म्हणजे लैंगिक स्वातंत्र्य, स्वैराचार अशी लेबलं लावण्यात आली. स्त्रीच्या साचेबद्ध प्रतिमा समाजात रुजवल्या. आज ही फक्त आत्मसमर्पण करणारी स्त्री म्हणजे संस्कारी असं गृहीत धरले जाते.
समाज स्त्रियांच्या वागण्यावरून तिचं चारित्र्य ठरवतो. समजा फेसबुकवर पारंपरिक शृंगार केलेला स्त्रीचा फोटो असेल तर कौतुकाचे वेगळे शब्द आणि तिथे जर आधुनिक पेहराव असेल तर तो स्वैराचार. मुळातच पारंपरिक आभूषणे हे तर स्त्रीच्या गुलामीची प्रतीक आहेत मग ते नथ असो वा मंगळसूत्र. स्त्रीचा शृंगार हा पुरुषाला उपभोगण्यासाठी असतो हे आजवरच्या साहित्यात दाखवून दिले आहे. ते ही पुरुषी भावनांना उत्तेजना देण्यासाठी परिधान केलेले असतात पण मग आधुनिक अथवा मॉडर्न कपडेच बलात्काराला करणेभुत कसे? आणि मग मॉडर्न पेहराव केलेल्या स्त्रीला स्वैराचारी म्हटलं जातं.
एका फुटपट्टीमध्ये स्त्रीच्या भावनांना तोललं जातं. नवरा जिवंत असताना फक्त त्यागपूर्ण वागलं पाहिजे आणि तो गेल्यानंतर अगदी अस्तित्व (तरी सतीसारखी अघोरी परंपरा नाही आता) संपल्यासारखं. एखादी स्त्री सावरली पुढे गेली की समाज आहेच खेकडा प्रवृत्ती घेऊन तिचे पाय खेचायला.
आज ही स्त्रीने मोकळेपणाने विचार मांडले की ते अनेकांना खुपतात पण त्यातल्या सत्य असत्यतापेक्षा ते एका स्त्रीने मांडले असं बघितलं जातं आणि थोडी मोकळीक मिळाली स्त्रीला की किती स्वैराचार करू लागली अशी टिप्पणी येते. स्त्री पुरुषांना परस्परांबद्दल वाटणारे आकर्षण, लैंगिक भावना या नैसर्गिकच. त्या अभिव्यक्त करण्याचे काही संकेत आहेत प्रवास आहे आणि ते मानवी आहेत. पण जगभरातल्या पुरुषसत्तेने स्त्रीला भोगवस्तू-मालकी वस्तू ठरवून त्यात पुरुषार्थ शोधला. स्त्रीने विरोध करणं म्हणजे पुरुषार्थाला आव्हान देणं. बाईचं लैंगिक वर्तन हे पुरुषसत्तेने स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला म्हणून आज ही आफ्रिका, मध्य आशियासारख्या देशात FGM (female genital mutilation) सारखे अघोरी प्रकार केले जातात. FGMचे बरेच प्रकार आहेत पण थोडक्यात fgm म्हणजे स्त्रीच्या योनीचा वरचा भाग कापला जातो. जेणे करून तिला लैंगिक संबंधाचा आनंद उपभोगता येणार नाही आणि त्यामुळे ती गैरमार्गाने जाणार नाही. किती अघोरी प्रकार?
खरचं का बाई एवढी स्वैराचारी आहे म्हणून एवढं दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तर मुळीच नाही तर ही पुरुषसत्तेची विकृती आहे. स्त्रीला माणूस म्हणून वागवण्यापेक्षा स्त्री म्हणून उपभोग घेणे त्यांना जास्त सोयीचे वाटते. आज स्त्रीच्या प्रत्येक कृतीला समाज संशयाच्या भावनेने बघतो मग ते कॉर्पोरेट क्षेत्रातील स्त्रीचा वावर असो अथवा एक यशस्वी अभिनेत्रीचा प्रवास असो. पुरुषसत्तेला नेहमीच वाटत आलं की त्यांनी मोकळीक दिली म्हणून स्त्रीला येवढं करायला मिळतं पण मोकळीक देणारे पुरुष कोण? आणि सतत गुलामीत राहणं का अपेक्षित आहे? स्वकर्तृत्वावर स्त्रीने प्रगती केली तरी मेहरबानी का वाटते ?
स्त्रीला स्वातंत्र्य दिलं तर कुटुंबव्यवस्था कोलमडून पडेल अशी टीका होताना दिसते. पण मग कुटुंब व्यवस्थेत राबणारी जबाबदारी घेणारी स्त्रीचं असते. इथे पुरुषांची नाही का जबाबदारी? दोघांनी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर नाही कोलमडणार कुटुंब. आजच्या स्त्रीने दोन्ही आव्हाने पेलल्यासारखी वाटतात. स्वातंत्र्याची जबाबदारी ही तिला कळली आहे. पण मग जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली फक्त तिनंचं का वावरायचं ?
स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये म्हणून सगळ्यांनीच प्रयत्नशील असलं पाहिजे मग स्त्रीला येवढं दडपून टाकण्याचा विचार का? मुळात सर्व बाजूने हा विचार व्हावा. फक्त एकाच अरुंद नजरेच्या कप्यातून स्त्रीकडे पाहणे बंद केलं पाहिजे. तिच्याकडे एक व्यक्ती म्हणून बघावे एवढंच!!
#स्त्रीआहेमाणूस