सौंदर्य आणि मन: बाह्य रूपापेक्षा आंतररुपावर लक्ष
Fair and Lovely ने “fair” शब्द काढून मार्केटिंगची स्मार्ट strategy आखली आहे. त्यामुळे त्यांचं उत्पादन वाढेल. एकंदरीतच सौंदर्याचं बाजारीकरण झाले आहे.
मग ते स्वतःच वय लपवून अधिक तरुण दिसा असं सांगणारी age miracle cream असेल अथवा पिंपलसाठी खूप भयानक दाखवणारी anti-pimple cream असेल… बाईला नेहमीच सौंदर्याच्या परिभाषेतच बघायचं का?
Black Lives Matter ह्या आंदोलनामुळे त्वचेचा रंग कुठलाही असला तरी त्याचा आदर करण्याची वृत्ती वाढली आहे. पण “black is beautiful” म्हणताना एक भीती कायम वाटते ती म्हणजे सौंदर्य ह्या शब्दाला अधोरेखित केलं जाऊ नये.
बाह्य सौंदर्य आणि समाज
द्रौपदीचा रंग सावळा करूनही महाभारतातील लेखक सौंदर्याचे विशेषण कमी पडत नाही. आणि मग हेच आकर्षक नाक, डोळे प्लास्टिक सर्जरीसारखे उपाय घेण्यास कारणीभूत ठरतात. एखाद्या व्यक्तीला फक्त बाह्य गुणांवर एवढं महत्त्व का द्यायचं?
शरीरापलीकडे पाहण्याची नजर शोधायला हवी. "सौंदर्य खरं तर मनातून जन्म घेत". व्यक्तीपरत्वे भाषा, आत्मविश्वास, वर्तणूक, यश, स्वावलंबन यामध्ये फरक असतो; परंतु मनाने खचून न जाणे आणि आनंदी राहणे हे मानसिक दृष्टिकोनावर अवलंबून आहे.
मनाचे सौंदर्य
बाह्य रूपाच्या आधी आंतररुपाची निगा राखावी. मनाला नेहमी चांगल्या गोष्टीत रमावणे, स्वतःमधली आसुया, इर्षा, क्रोध, आळस या भावनांना नियमन घालणे आणि जगाकडे व्यापक नजरेने पाहणे हे शक्य आहे. थोडक्यात मनाचे detoxification करणे सगळ्यांना शक्य आहे.
मी लहान असताना मला सगळी निग्रो माणसे एकसारखी दिसायची. हळूहळू त्यांच्याकडे पाहण्याची नजर बदलली आणि फरक समजला. आजकाल सोशल मीडियावर असलेले फोटो, सिनेतारकांचे glorify केलेले फोटो पाहून आपल्यातल्या कमतरता भासत राहतात. आपली नजर आणि दृष्टीकोन बदलतो आणि आपण जाहिरातींच्या बळी पडतो.
स्वतःवर प्रेम आणि स्वीकार
प्रत्येकाने स्वतःला स्वीकारलं पाहिजे, स्वतःवर प्रेम करायला पाहिजे, मग बाह्य रूप काळे असो वा गोरे, नाक बसके असो वा चापेकळी, केस घनदाट असो वा रुक्ष. मनाचा स्थितप्रज्ञपणा महत्वाचा. त्यामुळे आजपासून अस म्हणूया: "माझ्या सौंदर्याची सुरूवात मनाच्या सौंदर्याने".
"Beauty lies in the eyes of beholder" हे बरोबर आहे, पण सौंदर्य पाहण्यासाठी दृष्टीकोन हवा आणि तो बदलतोय. आपला स्वतःचा दृष्टीकोन चांगला ठेवावा.
बाजारीकरण आणि समाज
सुंदर दिसण्याचे दडपण, पार्टीसाठी सौंदर्यप्रसाधने, केमिकल्स, कृत्रिमता – हे सर्व आजच्या काळी एक प्रकारच्या बेपर्वाईत नकळत चालू आहे. सोशल मीडियामुळे सौंदर्याचे चुकीचे निकष पक्के झाले आहेत, आणि सगळे त्यांच्यासोबत जुळवू पाहतात. परंतु हे निकष आदर्श आहेत का? जीवनाबद्दल सकारात्मक देतात का?
वास्तविक सौंदर्य म्हणजे निरोगी राहणे, स्वावलंबी राहणे, मनाचा शांतीपूर्ण विकास. सौंदर्याच्या बाजारीकरणात आपण अप्रत्यक्षरीत्या सहभागी होतो कारण जाहिरातींच्या प्रलोभनांना बळी पडतोय. नैसर्गिक, साधेपणा आणि स्वतःला स्वीकारण्याची वृत्तीच सौंदर्याचे बाजारीकरण रोखू शकेल.
#BlackIsBeautiful
