🥗🥗 भरली कारली🥗🥗
Home  ∣  पाककृती   ∣   🥗🥗 भरली कारली🥗🥗

ज्यांना कारल्याची भाजी नाही आवडत ,त्यांना ती कशीही केली तरी नाही आवडत. मग ती कितीही आकर्षक पद्धतीने करा. ‘‘न आवडणारे लोक पण खात राहतील ‘‘ अश्या फसव्या हेडिंग ला भुलून आपण तशीच रेसिपी केली तरी नाही आवडत.🤪
असो
पण काही लोक नाही आवडत तरीही खातात किंवा अन्न हे पूर्णब्रह्म म्हणून खातात त्याच्यासाठी भरलेली कारली एक चांगला पर्याय ठरतो.

घरच्या घरी कारल्याची शेंगदाणा- काळा , कांदा लसूण मसाला घालून भाजी कशी बनवायची ते बघुयात. कडवटपणा न येणारी, चविष्ट व सोपी मराठी रेसिपी.

🌿 भरली कारली

🛒 साहित्य
• कारली – 4–5
• शेंगदाणा कुट – ½ कप
• लसूण – 8–10 पाकळ्या (बारीक)
• खोबरं – 3–4 तुकडे
• चिंच – लिंबाएवढी
• गूळ – 1½ टेबलस्पून
• मीठ – चवीनुसार
• हळद – ½ टीस्पून
• कांदा-लसूण मसाला – आवडीनुसार
• गरम मसाला – ½ टीस्पून
• कारळा कुट – १ चमचा
• तेल – आवश्यकतेनुसार
• पाणी – आवश्यकतेनुसार

👩‍🍳 कृती (Step by Step)

1️⃣ तयारी
• कारली धुऊन उभी कापा, आतल्या बिया काढा
• मीठ चोळून 10 मिनिटे ठेवा
• नंतर पिळून घ्या (कडवटपणा कमी होतो)

2️⃣ कारली मिठाच्या पाण्यात शिजवणे
• पाणी गरम करा, त्यात मीठ घाला.
• त्यात ५ मिनिट कारली वाफवून घ्या.

3️⃣ मसाला तयार करणे
• लसूण खोबरे बारीक करून घ्या.
•. कांदा चिरून घ्यावा. त्यात
• हळद, कांदा-लसूण मसाला घाला, कूट,
करळा कूट , गरम मसाला,मीठ घाला
• चिंचेचं पाणी व गूळ घालून . सगळं मिश्रण
एकत्र करा.

4️⃣ भाजी पूर्ण करणे
• करल्यामध्ये मसाला भरून घ्या.
• फोडणीसाठी कढई मध्ये तेल गरम करा.
· त्यात कढीपत्ता टाकून नंतर कारली टाकून
परतून घ्यावीत.
• थोडं पाणी घालून 5–7 मिनिटे शिजू द्या
• 2 मिनिटे परतून गॅस बंद करा

जेवढी भाजी मुरेल तेवढी छान लागते.
शिळी झालेली कारल्याची भाजी छान मुरते. आणि छान लागते सुद्धा.

🍽️ सर्व्हिंग
• गरम भाजी चपाती/ भाकरी / भात यांच्यासोबत खूप छान लागते 😍
• चव: कडू-गोड- आंबट परफेक्ट बॅलन्स