☘️☘️मेथीची भाजी☘️☘️
Home  ∣  पाककृती   ∣   ☘️☘️मेथीची भाजी☘️☘️

मेथीचा उपयोग भारतीय स्वयंपाकात सुमारे ३,००० वर्षांपूर्वीपासून झाला आहे असे मानले जाते.तिची जंगली वाढ काश्मीर, पंजाब आणि वरच्या मेथीचा उपयोग भारतीय स्वयंपाकात सुमारे ३,००० वर्षांपूर्वीपासून झाला आहे असे मानले जाते.
आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये मेथीचा उल्लेख आढळतो. अष्टांग हृदय, चरक संहिता, सुश्रुत संहिता यांसारख्या ग्रंथांमध्ये तिचे पचन सुधारण्यासाठी, रक्त शुद्ध करण्यासाठी, आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी गुणधर्म स्पष्ट केले आहेत. गंगेच्या मैदानांमध्ये नोंदलेली आहे.

🍀🍀🍀 मेथीची भाजी☘️☘️☘️

खरं तर मेथीची भाजी अनेक पद्धतीने बनवतात. जसं की काही जण भाजी परतताना कांदा घालून तर काही जण नुसता लसूण घालून परततात.तर काही जण डाळी भिजवून भाजीत घालतात. खरं तर डाळी भिजवून घातल्या नंतर भाजी पुरेशी तर बनतेच पण तीच पोषणमूल्य ही वाढते.
पालेभाज्या शिजल्या की खूपच कमी प्रमाणात होतात त्यामुळे डाळ हा चांगला पर्याय आहे. भाजी बनवताना डाळीचं पीठ देखील लावलं जातं. तर भाजी बनवताना पापड देखील टाकला जातो. मेथीची पातळ भाजीही बनवतात तर डाळ बनवताना ही मेथी घालून आमटी बनवली जाते.आज काल तर मेथी मलई, लसनी मेथी असे अनेक प्रकारे मेथी बनवली जाते.

चला तर आज आपण पाहू अगदी साध्या पद्धतीने भाजी कशी बनवतात .. साहित्य: • मेथीची पानं • लसूण – ४-५ पाकळ्या • हिरवी मिरची – २ (कापून) • तेल – २ टेबलस्पून • मीठ – चवीनुसार

कृती:
1. मेथीची पानं चांगली धुऊन बारीक चिरून घ्या.
2. लसूण ठेचून घ्यावा . मिरची चे काप करावेत.
3. कढईत तेल गरम करा.
4. तेल गरम झाल्यावर लसूण घालून ३० सेकंद परतून घ्या.
5. मिरची चे काप घालून परतून घ्यावेत
6. त्यात निवडलेली मेथी घालून मध्यम आचेवर ५-७ मिनिटे परता, पाणी सोडून भाजी शिजेल.
( आवडत असेल तर दाण्याचं कूट घालावा)7. मीठ घालून नीट मिसळा आणि गॅस बंद करा.