लापशी हा महाराष्ट्रातील पारंपरिक, सात्त्विक आणि पौष्टिक पदार्थ आहे. महाराष्ट्राप्रमाणे गुजरात आणि राजस्थान मध्ये लापशी केली जाते.

साधारपणे लापशी मंदिरातील प्रसादासाठी केली जाते.
पूर्वी लग्नात सुद्धा लापशी बनवली जात असे.
लापशी चा उल्लेख16व्या शतकात भावरप्रकाश निघंटू या आयुर्वेदिक ग्रंथात केला केलेला आढळून येतो . त्यात तूप, साखर आणि दूध वापरून बनवलेली लापशी आरोग्यास उपयुक्त म्हटली आहे.
17व्या शतकात भोजनकुतूहल मध्ये साफ केलेल्या गव्हाच्या पिठाने सविस्तर पाककृती दिली.
मुघल काळात ड्रायफ्रूट्स आणि डेअरी पद्धतींचा प्रभाव दिसतो, आणि 19–20व्या शतकात राजस्थान-गुजरातमध्ये सण-धर्म विधींमध्ये मुख्य पदार्थ म्हणून लापशी प्रसिद्ध झाली.
⸻
🪔 लापशी – च वैशिष्ट
• कमी साहित्य
• जाडसर, सुगंधी चव
• तूप आणि भाजणीचा स्वाद
• पोटाला हलकी पण ताकद देणारी
⸻
🧺 लागणारे साहित्य
• गव्हाची जाड रवा / जाडसर गहू भरड – 1 वाटी
• तूप – 5ते 6 चमचे
• गूळ (चिरलेला) – ½ वाटी
• पाणी – 2½ ते 3 वाट्या
• वेलदोड्याची पूड – चिमूटभर
• ओल्या खोबऱ्याचे काप..

⸻
🔥 बनवण्याची पारंपरिक पद्धत
1️⃣ कढई गरम करून त्यात तूप घाला
2️⃣ तूप गरम झाल्यावर भरड/रवा मंद आचेवर परतून घ्या
• रवा हलका गुलाबी झाला पाहिजे
• सुगंध येईपर्यंत सतत ढवळा
3️⃣ दुसऱ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवा
4️⃣ उकळत्या पाण्यात परतलेला /भरड रवा हळूहळू घाला
• गाठी होऊ देऊ नका
5️⃣ रवा शिजल्यावर त्यात गूळ घाला
6️⃣ गूळ विरघळेपर्यंत नीट ढवळा
7️⃣ शेवटी वेलदोडा व खोबऱ्याचे काप घालून झाकण ठेवा
👉 2–3 मिनिटांत मऊ, जाडसर लापशी तयार ✨



⸻
🍯 खास टिप
• वरून थोडं कढईतलं तूप सोडलं तर चव वाढते
• लापशी गरमागरम खावी
• आजारी माणसाला किंवा लहान मुलांना फार उपयोगी
⸻
🌿 लापशीचे फायदे
• शरीराला लगेच ऊर्जा देते
• पचनासाठी हलकी
• थंडी, अशक्तपणा, तापानंतर उपयुक्त
