घुटं
उडीद डाळ ही पूर्णपणे भारतीय आहे. दौलतपूर भागातील उत्खननात उडीद डाळ सापडली आहे. यावरून असं कळतं की आपण साडेतीन हजार वर्षांपासून उडीद डाळ वापरत आहोत. त्यामुळे प्राचीन काळापासूनच उडीद डाळ आपल्या आहारात वापरली जात आहे.
घुटं हे सातारा भागात जास्त प्रमाणात केली जाणारी रेसिपी आहे.
⸻
🍲 साहित्य :
• एक वाटी उडीद डाळ
• थोडी हरभरा डाळ
• तिखटानुसार मिरची
• 3–4 पाकळ्या लसूण
• थोडे आले
• थोडी चिरलेली कोथिंबीर
• 1/2 चमचा जिरे
• चिमूटभर हिंग
• 1/2 चमचा मोहरी
• कढीपत्ता
• 2–3 चमचे खोबरे (सौम्य चव आणि सुगंधासाठी)
• चवीनुसार मीठ
• तेल (फोडणीसाठी)

⸻
🥄 कृती :
1. उडीद डाळ आणि हरभरा डाळ हलकीशी भाजून घ्यावी.
2. कुकरमध्ये शिजवून घ्यावी.
3. मिरची, लसूण, आले, खोबरे आणि कोथिंबीर एकत्र वाटून घ्यावे.
4. कढईत थोडे तेल गरम करून मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालावा.
5. त्यात वाटलेली मिरची-लसूण-आले-खोबऱ घालून थोडी परतावी.
6. आता वाटलेली डाळ घालून चवीनुसार मीठ टाकावे.
7. मध्यम आचेवर नीट परतून घ्यावे.
8. शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.
⸻
🔥 टिप
गरमागरम घुटं तयार! हे घुटं भात, भाकरी सोबत खूप चविष्ट लागते. 😋
