संरक्षण आणि बंधन यांच्यातील संघर्ष …..
अनेकदा ज्या गोष्टीला आपण संरक्षण म्हणतो, तीच गोष्ट बंधनासारखी दिसू लागते.
जे कुत्रे आपण आपले रक्षक मानतो, तेच जर आपल्याला पहारा देण्याऐवजी कैद करत असतील तर?
हीच आहे ह्या चित्रपटाची थीम.
“sometimes protection and restriction they both look the same “या एका ओळीवरून चित्रपटाचं कथानक सुचल अस चित्रपटाचे कथाकार बहुल रमेश यांनी एका मुलाखतीत सांगितले. खर तर भव्य सेट किंवा अति चकचकीत सिनेमा पेक्षा बऱ्याचदा चित्रपटाच्या पटकथेनुसार आलेला निसर्ग बघताना एक वेगळी मजा किंवा समाधान वाटत.
eko ची सिनेमॅटोग्राफी अगदी सुंदर झाली आहे.
हिरवेगार जंगल, खोल दर्या, धबधबे, डोंगरमाथ्यावर एक छोटस घर आणि त्याला पहारा देणारे कुत्रे!!
कुरियाचन या बेपत्ता गुन्हेगाराच्या शोधात वेगवेगळ्या लोकांचा प्रवास वेस्टर्न घाटात येऊन एकत्र येतो. दुर्मिळ कुत्र्यांपासून सुरू झालेला हा शोध मृत्यू, फसवणूक आणि रहस्यांनी गुंतत जातो. अखेरीस होणारा उलगडा बघून जेव्हा चित्रपट संपतो तेव्हा तो आपल्या डोक्यात चालू होऊन मग आपण अनेक गोष्टींचे अर्थ लावत बसतो.
खोल दरी असलेल्या घाटमाथ्यावर बसून दुर्बिणीतून काहीतरी अगदी शांत पणे पहाणारी वृध्द स्त्री. शेजारी बसलेला तरुण
आणि पाठीमागे घुरघुर करणारी कुत्री!!
या दृश्यावर हा चित्रपट संपून जातो
हा चित्रपट Netflix वर उपलब्ध आहे”
Poster: Netflix / Film Production Company (for review purpose)
