
वाडा चिरेबंदी – कुटुंब व्यवस्थेचं वास्तववादी दर्शन
सुट्यां पुरती गाव हवे, पण कमावण्यासाठी शहरच किंवा परदेश हवे. अशी एक संस्कृती तयार होत चालली आहे. अर्थात याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत.
शहरात राहणारा एक भाऊ आणि गावात राहणार एक भाऊ यांच्या जीवनातील फरक आर्थिक, सांस्कृतिक आणि राहणीमान यातून दिसतो. आणि मग मनात सुरू होणारी दंद्व आणि इर्षा...
खर तर सुट्यां पुरते एकत्र राहण म्हणजे एकत्र कुटुंब नव्हे, पण त्या सुट्या मध्ये सुध्दा एकत्र सहवास आणि संवाद नकोसा होऊन जातो. मग एकत्र राहताना फक्त स्वतःच्या बायको-मुलांचा विचार केला जातो. अश्या राहण्याला आजही एकत्र कुटुंब हे नाव देणं योग्य आहे का?
एकत्र कुटुंबपद्धतीचे गुणगान गाणाऱ्या माणसांना कदाचित फार एकत्र राहण्याचा अनुभव नसतो. बहुतांश हे असच आहे. बालवयात एकत्र कुटुंब फार आवडतात; मला लहानपणी घरी वेगळं राहण्याचा विषय झाला तर तो नको असायचा आणि नातवंड येईपर्यंत माहेरी एकत्र राहायचं. पण आता एकत्र कुटुंब व्यवस्थेचा उदो उदो करण्याची इच्छा संपली कारण आपण सगळेच व्यक्तीकेद्री झालो आहोत.
म्हणूनच वाडा चिरेबंदी बघण्याची खूप दिवसांची इच्छा ती पूर्ण झाली.
नातेसंबंध आणि व्यक्तिमत्व
नातेसंबंध, पोकळ श्रीमती, ताणलेले नातेसंबंध हे अतिशय वास्तववादी दाखवलं आहे. पुरुषसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये फक्त बायकाच कोंडीत आणि दुय्यमत्व स्वीकारलेल्या नसतात; आयुष्यभर दुय्यमत्व स्वीकारलेले पुरुषही असतात. नाटकात चंदू हा भाऊ असूनही बिनावेतनाचा घरगडी बनून राहतो.
बाई ने दुय्यम अथवा शोषित राहण्याची एवढी सवय केलेली असते की यातून ती जगण्याचं प्रगल्भ तत्वज्ञाच्या जवळ पोहचते आणि स्वतःला दुखः पेक्षा मोठ करते.
प्रभावी संवाद / कोट्स
प्रभा ची आई म्हणते: "दुःख काय कोणाला दाखवायची गोष्ट आहे, आपले आपल्याजवळ ठेवावे. अतीच झाले ना ह्या वाड्यास अंधाऱ्या खोल्या आहेत, त्यात गुपचूप डोळे गाळावेत. देशपांडे च्या साऱ्या बायकांनी हेच केलं."
"सुख मिळेना म्हणून सुखास मीच समाधानाने निरोप दिला, जे मिळत नाही आपणहून दूर लोटावे."
नाटकाचे महत्व
वाडा चिरेबंदी नाटक हे कुटूंब व्यवस्थेचं वास्तववादी दर्शन घडवतं आणि सामाजिक इतिहास बनून जातं. नाटकातील पात्रे, संघर्ष आणि संवाद ग्रामीण जीवनातील सत्यता आणि भावनिक गुंतागुंत दाखवतात.