Haq
Home  ∣  मनोरंजन   ∣   Haq

लग्नांतर बानो किचन मधे जाते, तिला तीन कुकर दिसतात म्हणून ती स्वयंपाक करणाऱ्या मदतनीस ला विचारते तीन तीन कुकर.. तेव्हा ती मदतनीस म्हणते, “ एकाची रिंग बिघडली आहे, एकाची शिट्टी बिघडली आहे आणि साहेब हे दुरुस्त न करता कूकरच नवीन आणणात. इथुन च अब्बास ची थोडीशी मानसिक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे..( बाई आणि वस्तू)

खऱ्या शहाबानो केस मधे divorce झाला तेव्हा शहा बानो ६२ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पतीने दुसरे लग्न करून त्याना तीन तलाक म्हणून घरातून बाहेर काढलेल असते आणि पोटगी देण्यास नकार दिलेला असतो. वास्तविक पातळीवर ही केस divorce ची नसून मेंटेनेंस किंवा पोटगी ला दिलेल्या नकाराची होती. शाहबानो केस ची प्रेरणेने जिग्ना वोरा यांनी एक बानो: भारत की बेटी ह्या पुस्तकावर आधारित असलेला हा सिनेमा भडकपणा टाळून अतिशय शांत , समजूतदारपणे दाखवला आहे.

जेव्हा बानोची संमती न घेता अब्बास दुसरं लग्न करतो तेव्हा ही अब्बास बानो ला बरीच खोटी कारण देवून समजूत घालतो. नंतर ही लग्नाचं कारण ‘ सबाब ‘ सांगून स्वतःला मोठं दाखवतो. खरं काय आहे हे बानो ला समजून सुद्धा, ती परिस्थिती स्वीकारून झुकून दुय्यमत्व स्वीकारून स्वतःला बेगम (पहिली बायको)समजून राहते. पण जेव्हा तिच्या छोट्याश्या इच्छेची पण दखल घेतली जात नाही तेव्हा तिला तीच अस्तित्व आणि पूर्ण हक्क संपल्यासारखा वाटतो. आणि ती निघून जाते. पण तिच्या निघून जाण्याला सुद्धा लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ वाटतो का ? असा प्रश्न विचारून अब्बास तिलाच दोषी ठरवतो.

बानो जेव्हा माहेरी जाते तेव्हा समाज , काजी , तिची आई या सगळ्यांनाच ,तिने नवऱ्याशी तडजोड करून राहावं असं च वाटत. सगळे विरोधात असताना अश्या परिस्थितीत तिच्या पाठीशी उभे राहतात ते तिचे वडील! मुस्लिम कोर्ट, समाज जेव्हा सगळे बानो च्याा विरोधात असतात तेव्हा अतिशय संयमी, विवेकी न्यायाच्या, नैतिकतेच्या तत्वाला धरून तिचे वडील खंबीर पणे तिच्या पाठीशी उभे असतात.

इकरा म्हणजे वाच!
कुराणाची सुरुवात या शब्दाने होते !
कमी शिकलेली बानो सुद्धा कुराण अतिशय डोळस पद्धतीने वाचून तिचा लढा याच बळावर जिंकते.
जेव्हा तिचेच मुस्लिम लोक तिला गद्दार ठरवतात तेव्हा प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद ती खंबीर पने करते.
काजी, मौलवी सांगतात तोच धर्म असा आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा ती कुराण च अनुकरण करत पुढे जाते. या चित्रपटामध्ये जो अंतिम युक्तिवाद दाखवला आहे तो चित्रपटाला उच्चतम स्थानी नेहतो.

या चित्रपटात एक गोष्ट जाणवते ती म्हणजे बानो ला कोर्ट मध्ये दुजाभाव सहन करावा लागतो. न्यायाधिशांकडून तिला वारंवार एकच सल्ला दिला जातो: “अपने लोगों के पास जाओ.”

नंतर चे अब्बास खानचे भाषण आणि त्याचा पत्नीला पोटगी नाकारण्याचा निर्णय यांचा अर्थ बानो पोटगीशी थेट संबंधित नाही. तो हे भाषण फक्त धर्म आणि धर्मग्रंथ यांना संविधानाने ढवळाढवळ करू नये या हेतूने करतो. आणि केस ला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतो.

त्याच्या भाषणावर बानो सडेतोड आणि भावनिक उत्तर देते. ती न्यायालयाला, आणि अप्रत्यक्षपणे आपल्या नवऱ्यालाही काही प्रश्न विचारते.

यामी गौतमी ने यात कुठेही overacting न करता अतिशय ताकतीचा अभिनय केला आहे. मला ती खूप कमाल वाटली ह्या चित्रपटात. इमरान हाशमी ने सुद्धा अतिशय सुरेख काम केलं आहे.

आपल्याच संकटाना सामोरी जाणारी बानो आपल्या हक्कासाठी लढते. म्हणून ती अब्बास वर सूड घेणारी अथवा समाजासाठी समाजसुधारणा करते असा आविर्भाव अजिबात आणत नाही.

हा सिनेमा Netflix वर उपलब्ध आहे.

Poster courtesy of Netflix. Used for review purposes only.